Video Thumbnail

पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणे यांनी सहकारी बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत एकाच वेळी पाच मानाचे पुरस्कार पटकावले आहेत.
पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र), अर्बन बँक्स फेडरेशन आणि NAFCUB यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३ रे राष्ट्रीय नागरी सहकारी बँकिंग शिखर परिषद आणि पुरस्कार २०२५ बुधवार, दि. २२ एप्रिल २०२५ रोजी Hotel Conrad Pune येथे पार पडली. या प्रतिष्ठित सोहळ्यात पुणे पीपल्स को-ऑप. बँकेचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात बँकेस ‘बेस्ट मल्टी स्टेट अर्बन को-ऑप. बँक’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार बँकेचे वतीने अध्यक्ष श्री. श्रीधर गायकवाड, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते, संचालक विश्वनाथ जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. संजय भोंडवे आणि बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी स्वीकारले. तसेच बँकेचे अध्यक्ष श्री. श्रीधर गायकवाड यांना ‘बेस्ट चेअरमन ऑफ द इयर’ म्हणून सन्मानित करण्यात आले. जोखीम व अनुपालन व्यवस्थापनातील प्रभावी अंमलबजावणीबद्दल श्री. मोहन थोरात यांना ‘बेस्ट रिस्क अँड कम्प्लायन्स इम्प्लिमेंटेशन’ पुरस्कार मिळाला. तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दलहा बँकेचे आयटी प्रमुख श्री. कैलास पवार यांना ‘बेस्ट CISO ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच निधी व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल बँकेचे ट्रेझरी हेड श्री. घनश्याम सणस यांना ‘बेस्ट ट्रेझरी मॅनेजमेंट इम्प्लिमेंटेशन’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

Video Thumbnail

अमृतमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ.....
पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा ७५ वा अमृत महोत्सव दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे
श्रीधर गायकवाड – अध्यक्ष
बिपीनकुमार शहा – उपाध्यक्ष
ॲड. सुभाष मोहिते – अध्यक्ष, व्यवस्थापकीय समिती
संचालक मंडळ, सर्व कर्मचारी वृंद
आणि समस्त बँक खातेधारक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी
मा. श्री. दिपक तावरे साहेब,
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य
यांच्या शुभहस्ते,
डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे,
मनोरुग्ण महिलांसाठी मोलाचे व समर्पित कार्य करणाऱ्या
माऊली सेवा प्रतिष्ठान (अहिल्यानगर) चे संस्थापक
यांना ‘पुणे पीपल्स पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
तसेच
डॉ. पराग काळकर,
प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
यांच्या शुभहस्ते
पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या
नव्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
विश्वास, सेवा व सहकार या मूल्यांवर आधारित
पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा
७५ वर्षांचा गौरवशाली प्रवास
या सोहळ्याद्वारे साजरा करण्यात आला.